💥 लेक जावयाच्या भांडणात पडली! अन जीव गमावून बसली जावयाने केला सासूचा खून


नेकनूर : नवरा-बायकोत असलेले कुरबुरी सोडवण्यासाठी जावयाकडे आलेल्या सासूचा जावयाने व त्याच्या वडिलांनी खून केल्याची घटना नेकनुर जवळील मांडव खेल येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अलका हनुमंत जोगदंड वय 40 राहणार वानगाव, हल्ली मुक्काम अंकुश नगर बीड .हे आपल्या मुलीकडे 23 मे रोजी गेल्या होत्या .नवरा-बायकोमध्ये कुरबुरी होत असल्याने ते सोडवण्यासाठी अलका जोगदंड या मांडव खेल या ठिकाणी आल्या होत्या , पण पाच सहा दिवस झाले तरीही त्या बीड येथे वापस न आल्याने अलकाच्या नवर्‍याने अलका हरवली असल्याची तक्रार ता. 2 जून रोजी नेकनूर पोलीस स्टेशनला दाखल केली .

याप्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता जावयाने सासूचा खून केल्याचे निष्पन्न

झाले .नवरा बायकोच्या भांडण मध्ये नेहमी लक्ष घालून लेकीची बाजु घेते म्हणून अलका हनुमंत जोगदंड वय 40 यांना ट्रॅक्टर ने धडक देऊन डोक्यात दगड घालून खून केला व त्याचे प्रेत गायरानात पुरले. व काही न घडल्याच्या तोऱ्यात हे दोन्ही आरोपी पाच ते सहा दिवस वागत होते. नेकनूर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदरील प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी सचिन तुकाराम कदम वय 26 व तुकाराम रामभाऊ कदम वय 50 दोघे राहणार मांडवखेल. तालुका बीड यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 122 /20 कलम .302 ,120 ब, 201 ,34 भा.द वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास स.पो.नि . एल. व्ही .केंद्रे हे करत आहेत .सदरील घटना 23 तारखेला घडल्याचे शक्यता असल्याने प्रेत हे शवविच्छेदनासाठी नेकनूर या ठिकाणी आणणे शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह बीडचे तहसीलदार व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री कबाडे ,उपाधीक्षक सावंत, स.पो.नि .एल .व्ही .केंद्रे हे दंगल नियंत्रण पथक व पोलीस फौजफाट्यासह शनिवारी घटनास्थळी दाखल झाले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात फौजदार केंद्रेना अपयश

फौजदार लक्ष्मण केंद्रे हे नेकनुर येवून अजून दोन महिने ही झाले नाही विशेष म्हणजे देशात व राज्यात लाॅकडाऊन आहे. कलम 144 लागू असताना संचारबंदी असताना नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, विनयभंग, अवैध दारू विक्री, मटका, अशा गुन्हेगारी मोठी वाढ झाली आहे. तर फौजदार दर रोज सोशल डिस्टंडींगच्या नावाखाली भाजीपाला विकणारे शेतकरी, फळ विक्रेते, व ईतर छोट्या व्यावसायिकांना त्रास देत असुन जणु काय भाजीपाला विक्रीला बंदीच आहे. अशा प्रकारची मनमानी कारभार मी करेन तो कायदा अशा अविर्भावात हे महाशय कारभार करीत आहेत नेकनुर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यामध्ये फौजदार केंद्रे अपयश आले आहे. याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी घ्यावी अशी मागणी नेकनुर व परिसरातील नागरिका कडुन होत आहे.