👉 आळस असा दूर करा
आयुष्यात यशाची शिखरे गाठायची असेल तर सर्वप्रथम अंगातून आळशीपणा झटकायला हवा. खालील काही टिप्स तुम्हाला यासाठी मदत करतील... (Get rid of laziness in Marathi)
🏃♀️ व्यायाम आणि ध्यान : (Exercise and meditation in Marathi) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर दररोज व्यायाम करा. यामुळे तुमचा पूर्ण दिवस चांगल्या मूडमध्ये आणि उत्साहात जाईल.
🧎♀️ ध्यानस्थ बसा : (Meditate)ध्यानस्त बसल्याने आपले आपल्या शरीरावर ध्यान केंद्रित होते. ज्यामुळे आपले विचार आणि आपला स्वभाव बदलू शकतो.
📙 यशस्वी लोकांच्या गोष्टी वाचा : माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मोटीव्हेशनची गरज असते. तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र वाचू शकता ज्यामुळे आळस झटकायला तुम्हाला प्रेरणा भेटेल.
🙇♀️ पुरेशी झोप घ्या :(Get enough sleep) माणसाला सरासरी 8 तासाच्या झोपेची आवश्यकता असते. त्यापेक्षा जास्त झोप म्हणजे निव्वळ आळस आहे. त्यासाठी दिवसातून झोपेचे प्लॅनिंग करून घ्या.
⚡ भावनांकडे दुर्लक्ष करा : (Ignore emotions) ज्या भावना तुम्हाला आळसाकडे घेऊन जातात आणि काम करण्यामध्ये अडथळा आणतात. अशा भावनांकडे दुर्लक्ष करा.
✍️ स्वतःची रोजनिशी बनवा :(Make your own diary) दररोजच्या जीवनात तुम्ही स्वतःचे वेळापत्रक बनवा. जेणेकरून तुम्हाला कोणत्या वेळी काय काम करावे? हे लक्षात राहील आणि तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्थ राहाल.
👍 कामांचे नियोजन : (Work planning)आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कामांना छोट्या-छोट्या कामांमध्ये विभागून घ्या आणि ते पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला आळस हि येणार नाही आणि काम हि पूर्ण होईल.
🙎♂️ सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा : जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिले तर नकारात्मक उर्जा तुमच्यात येणार आणि सकारात्मक वातावरणात राहिले तर सकारात्मक उर्जा येणार. म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासातच राहा.
👉 सुरुवात तर करा : (Get started)शेवटची आणि महत्वाची टिप्स म्हणजे कामाची सुरुवात करण्याचे नक्की करा. कारण कोणतेही काम हाती घेतले कि, ते काम करण्याची इच्छा आपोआप निर्माण होत असते. चालढकल नकोच!
टिप्पणी पोस्ट करा