✍️ सामान्य ज्ञान General Knowledge २७/०६/२०२०


● भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे नाव काय?

उत्तर : ‘विवेकानंद योग विद्यापीठ’ (VAYU)

● समुदायाप्रती सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि विकास प्रक्रिया याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिन’ कधी साजरा केला जातो?

उत्तर : 23 जून

●  मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हरयाणा सरकारसोबत कोणत्या कंपनीने करार केला?

उत्तर : रिलायन्स जिओ

● ‘बीदौ उपग्रह प्रणाली’चे प्रक्षेपण कोणत्या देशाने पूर्ण केले आहे?

उत्तर : चीन

● ‘जिवाणू पेशी’चे आवरण नष्ट करणारे ‘नॅनोझाइम’ कोणत्या संस्थेनी विकसित केले आहे?

उत्तर : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु

● प्रथम ऑनलाइन ‘कान चित्रपट महोत्सव-2020’ मधील आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर : प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारणमंत्री)

● चीनचा ‘दिओयू’ बेट यांच्या मालकी मुद्द्यावरून जापान आणि तैवान सोबत वाद चालू आहे. अलीकडेच जापानने या बेटाला दिलेले नवीन नाव काय आहे?

उत्तर : ‘टोनोशिरो सेनकाकू’

● रमेश पोखरियाल यांनी उद्घाटन केलेल्या द्वितीय आवृत्तीच्या YUKTI योजनेचे पूर्ण नाव काय?

उत्तर : Young India combating COVID with Knowledge, Technology, and Innovation