♿ शासकीय संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण


⚡ 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात, तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील दिव्यांग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे दिव्यांगत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
Education and training of the disabled from government institutions

🧐 योजनेच्या प्रमुख अटी :

• विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
• अर्जदाराचे दिव्यांगत्व किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
• अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

📄 आवश्यक कागदपत्रे : 

•  शासकीय संस्थेचा विहित नमुन्यातील अर्ज.
• अर्जदाराचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
• अर्जदाराचा रहिवाशी दाखला.

💁‍♂ लाभाचे स्वरूप असे :  दिव्यांगत्व विचारात घेऊन दिव्यंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात येते.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा :
• संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)