💥 बीड ब्रेकिंग न्युज:: बोगस बियाणे विक्री,केदारनाथ जाजू विरुद्ध गुन्हा !
बीड बातम्या : लॉक डाऊन आणि कोरोनामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचे धंदे व्यापारी करत असल्याचे उघडकीस आले आहे.मोंढा भागातील व्यंकटेश ऍग्रो या दुकानातून बोगस कपाशी बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,या प्रकरणी केदारनाथ जाजू यांच्याविरोधात पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .
बीड शहरातील मोंढा भागात असलेल्या व्यंकटेश ऍग्रो या दुकानातून बोगस बी टी बियाणांची विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने शिवाजी आमटे या शेतकऱ्यास दुकानात पाठवले,या ठिकाणी बोलगार्ड ऐवजी बडगार्ड नावाच्या बियाणांची पाकीट विक्री होत असल्याचे आढळून आले,या बियाणांची कुठेही नोंदणी नसल्याचे समोर आले
दुकानात तपासणी केली असता तब्बल 42 पाकीट आढळून आली,बियाणांच्या पाकिटाची किंमत कमी असताना एक हजार रुपयाला विक्री केली जात असल्याचे उघड झाले,त्यानंतर केदारनाथ जाजू यांच्या विरोधात पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
टिप्पणी पोस्ट करा