🌱 कापूस लागवड


⚡ कापूस लागवड मध्यम ते भारी जमिनीत करावी. हलक्‍या जमिनीत लागवड करण्याचे टाळावे, कारण अशा जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठी घट येते. पिकाची फेरपालट करावी. एकाच जमिनीत कापसावर कापूस घेण्याचे टाळावे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादन वाढण्यासाठी फेरपालट आवश्‍यक आहे.

💁🏻‍♂️ वाणाची निवड करताना... : कापूस वाणाची निवड करताना फक्त जाहिरातींवर विश्‍वास न ठेवता कापूस वाणाचे गुणधर्म जसे - वाणाचा कालावधी, बोंडांचे वजन, धाग्याची लांबी, पुनर्बहराची क्षमता, कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता, अवर्षण परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करूनच वाणाची निवड करावी.

👉🏻 एकाच शेतात खूप जास्त वाणांची लागवड न करता एक किंवा दोनच अनुभवातील व खात्रीचे वाण लावावेत.

👀 लागवडीचे अंतर : कोरडवाहू परिस्थितीत एकरी झाडांच्या संख्येला महत्त्व असल्यामुळे, एकरी सात ते दहा हजार झाडांची संख्या राहील या दृष्टीने लागवडीचे अंतर ठेवावे. मध्यम ते भारी जमिनीत 3x2 फूट, 4 x 1.5 फूट, 6 x 1 फूट किंवा 4 x 1 फूट यापैकी आपल्या सोयीचे अंतर ठेवावे.

👍 खत : दोन ओळींत जास्त अंतर असल्यास त्यात सोयाबीन किंवा उडीद / मुगाचे आंतरपीक घेता येते. कापूस पिकाला लागवडीपूर्वी उपलब्धतेप्रमाणे पुरेसे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. कोरडवाहू बीटी कपाशीसाठी एकरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाशची मात्रा कोणत्याही खताच्या माध्यमातून लागवडीपूर्वी आडवी - उभी पेरून द्यावी.

🌽 झेंडू आणि मक्‍याची लागवड : एक महिन्यानंतर 25 किलो नत्र द्यावा. माती परीक्षणाच्या आधारावर आवश्‍यकतेनुसार दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा द्यावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्यादृष्टीने कापूस पिकास दर सात ओळींनंतर एक ओळ चवळीची व एक ओळ भगरीची कापसाची ओळ कमी न करता पेरावी, कापूस शेताच्या चारही बाजूंना झेंडू आणि मक्‍याची लागवड करा.

📌 चवळीमुळे रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण होऊन मित्र किडींची संख्या वाढते, तर झेंडू, मका व भगरीमुळे बोंडअळ्यांचे नियंत्रण होण्यास मदत होते.