💥 कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू... Coronary woman dies ...


👉 उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर परळी शहरातील आजाराने ग्रासलेल्या एका 57 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

👉 कोरोनामुळे मयत व्यक्तींचा आकडा 3 असून अद्याप केजच्या महिलेची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे घेण्यात आलेले नाही.

👉 परळी शहरातील एक महिला किडनीचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर 5 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

👉 तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला किडनीच्या आजारासह मधूमेह, हायपरटेंशन, न्यूमोनिया हे आजारही होते.

👉 बुधवारी तिला रुग्णालयातून सुटीही देण्यात येणार होती. परंतू डायलेसीस करायचे असल्याने ठेवण्यात आले होते. गुरूवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.