💥 पैठण शहरासह ग्रामीण भागात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण


👉 गेल्या चोवीस तासांत पैठण शहरात आणखी दोन पेशंट आढळून आल्याने  शहरातील रूग्ण संख्या सोळा पर्यंत पोहचली.

👉 शनिवारी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ पाटील जाधव, पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, नपचे स्वच्छता निरीक्षक भगवानकाका कुलकर्णी, अश्विन गोजरे यांनी सकाळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.

👉  नगर परिषदेच्या वतीने उपरोक्त परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून होम कोरान्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

👉 होम कोरान्टाईन कालावधीत काय करावे व काय करू नये याबाबतीत प्रशासनाने स्पष्ट आशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. संबंधितांना नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

👉 दरम्यान, तालुक्यातील पाचोड येथेही दोन बाधीत रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीने तेथे धाव घेऊन खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

👉 तेथे कॄषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भूमरे, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांसोबत चर्चा केली. येथे एका डाॅक्टरला कोरोनाची लागन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

👉 पैठण शहरात तीन खासगी डाॅक्टरांना होम कोरान्टाईन मध्ये भरती करण्यात आले असून ईतर रूग्णांवर शहरातील कोरोना केअर सेंटर मध्ये सध्या उपचार सुरू आहेत.