💥 काळे कारखान्याची चिमणी कोसळली


निसर्ग चक्रीवादळाने कोपरगाव तालुक्याला तडाखा बसला असून कर्मवीर शंकरराव काळे  कारखान्याच्या आसवानी विभागाची 125 फुटाची चिमणी कोसळली. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
The chimney of the black factory collapsed
चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर त्याचे लोन कोपरगाव तालुक्यात पोहोचले. या वादळाची गती साधारण 60 ते 70 किलोमीटर वेगाने दक्षिणेकडून उत्तरेकडे होती.
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवनी विभागाच्या चिमणीला तडाखा बसल्याने ती कोसळली. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पुण्याच्या एका कंपनीने केले असून तीच कंपनीच व्यवस्थापनही  बघत असल्याचे कळते.
साडेपाच वाजेच्या सुमारास कर्मचारी कारखान्यातून बाहेर पडतात चिमणी कोसळली. हवेबरोबर पावसाच्या चांगल्या सरी कोसळू लागल्या होत्या. खबरदारी म्हणून दुपारपासूनच संपूर्ण शहर व तालुक्यातील वीज पूर्णतः बंद करण्यात आली होती.
याशिवाय धोत्रे गावातील 4 शेडचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सावधानतेचा इशारा देत नागरिकांनी खबरदारी घ्यावी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.