🧘‍♂ करिअर : योग क्षेत्र Career: Yoga field


हल्ली योगाची लोकप्रियता वाढत असल्याने याकडे आता करिअर म्हणूनही बघितले जात आहे. लवकरच योगशास्त्राला इंडस्ट्रियल स्वरूपही दिले जाऊ शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

🧐 करिअर ऑप्शन : 

▪ बारावी ग्रॅज्युएशननंतर योगशास्त्रात डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे.
▪ बॅचलर ऑफ आर्ट्स (योग), मास्टर इन आर्ट्स (योग), पीजी डिप्लोमा इन योग थेरपी अशा कोर्सेसला प्रचंड मागणी आहे.
▪ योग एक्सपर्ट अथवा नॅचरोपॅथीच्या स्वरूपात करिअर विकसित करू इच्छित असल्यास साडेपाच वर्षांचा बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्सेस (बीएनवायएस) डिप्लोमा केला जाऊ शकतो.

👍 रोजगाराच्या संधी काय? : 

▪ शैक्षणिक क्षेत्र, नियोजन आणि प्रशासन, रुग्णालय आणि उपचार केंद्रे, योग चिकित्सालय यामध्ये योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ कॉर्पोरेट संघटना, आंतरराष्ट्रीय कंपन्या, हेल्थ स्पा, ब्यूटी सलून आणि जिम येथेही योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ काही टेलिव्हिजन चॅनेल्सही योग कार्यक्रमासाठी प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ उद्योजक, व्यापारी, सिनेअभिनेता किंवा आजारी व्यक्ती खासगी योग प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ वेळेची कमतरता असल्यास तुम्ही पार्टटाईम योग क्लासेस घेऊ शकता.

📍 देशभरात अनेक शासकीय आणि गैरशासकीय संस्थानांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची काही नावे खालीलप्रमाणे आहेत.

▪ मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योग, नवी दिल्ली.
▪ लखनौ विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश.
▪ डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ, फैजाबाद, उत्तर प्रदेश.
▪ बुंदेलखंड विद्यापीठ, झाशी, उत्तर प्रदेश.
▪ देव संस्कृती विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ हेमवती नंदन बहुगुणा गढ़वाल विद्यापीठ, पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड.
▪ पतंजली विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश.
▪ डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश.
▪ जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर, मध्य प्रदेश.
▪ महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठ, कटनी, मध्य प्रदेश.
▪ कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा.