🌳 करिअर : ‘फॉरेस्ट्री’


हल्ली पर्यावरण आणि हवामानाचा ढासळलेला समतोल पाहता 'फॉरेस्ट्री' तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी काळात ‘फॉरेस्ट्री’ विषयातील तज्ज्ञांची मागणी  वाढणार आहे.
 Career: Forestry

🤓 ‘फॉरेस्ट्री’ म्हणजे नक्की काय? :

● ‘फॉरेस्ट्री’ म्हणजे वनांची पाहणी आणि सोबतच वनक्षेत्र विकसित करणे.
● हा विषय वनांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
● वृक्षांच्या सुरक्षा करण्याची जबाबदारी देखील 'फॉरेस्ट्री'कडे असते.

💁‍♂️ फॉरेस्टरचे कार्य :

● वनभूमीच्या मालकांना रोपट्यांच्या प्रजाती निवडीसाठी मदत करणे, वृक्षांचे प्रकार, अंदाजपत्रक निर्धारण आणि आर्थिक सर्वेमध्ये मदत करणे.
● वनांना त्याचे पुनर्वैभव प्राप्त करून देणे.
● पडीक भूमीवर वननिर्मितीसाठी मदत करणे.
● लाकूड व्यवसायाशी संबंधित व्यापारी, वनांचे मालक, स्थानिक प्रशासन आणि ग्राहकांशी संपर्क साधणे.
● ‘इको-टूरिझम’ व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करणे.
● अवैध वृक्षतोड, किडे आणि रोगांपासून वनांचे संरक्षण करणे.
● वन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित कायद्यांमध्ये काय बदल झाले, याची माहिती ठेवणे.

✔️ रोजगाराच्या संधी : फॉरेस्टरला पुढील विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते.  सिल्विकल्चरिस्ट, फॉरेस्ट रेंज ऑफिसर, जू क्यूरेटर, डेंड्रोलॉजिस्ट, सल्लागार, इथनोलॉजिस्ट, एन्व्हायरमेंट रिसर्चर.

🎯 बॅचलर कोर्सेस : उमेदवार फिजिक्स, केमिस्टड्ढी आणि बायोलॉजी विषयासह 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बी.एस्सी. इन फॉरेस्ट्री या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. देशातील 40 पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.

🎯 मास्टर्स/ पीजी डिप्लोमा कोर्स : 'फॉरेस्ट्री' त बी.एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर उमेदवारांना एम.एस्सी. कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. यात अनेक स्पेशलाइज्ड कोर्स करता येतात. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा स्तरावर देशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि नामांकित संस्थांमध्ये कोर्स उपलब्ध आहेत.

💸 वेतन : उमेदवार शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करू शकतो. सुरुवातीचे वेतन २५ हजार रुपये असू शकते. मास्टर डिग्री तसेच अनुभवांनुसार 40 ते 45 हजार रुपये मासिक वेतन मिळू शकते.