🕺 करियर : नृत्यकला Career: Dance


नृत्य ही एक प्राचीन कला असून ती लोकांच्या मनोरंजनाचे लोकप्रिय माध्यम आहे. ज्यांना नृत्याची आवड आहे ते विद्यार्थी या कलेत आपले करियर देखील करू शकतात. ते कसे? याबाबत पाहुयात.. 

🤓 संधी काय? : 

1. विविध कला केंद्र, दूरचित्रवाहिन्या, नृत्य शिक्षक या ठिकाणी रोजगाराची संधी आहे.

2. नृत्य संस्था, म्युझिक अल्बम, सिनेमातही करियरचा उत्तम मार्ग आहे.

3. परदेशात हिंदुस्थानी लोकनृत्य कलाकलांसाठी मागणी असते.

4. साल्सा, जैज, रॉक, हिप हाप, बेले असे पाश्चात्त्य नृत्य प्रकार येणाऱ्यांनाही भरपूर मागणी असते.

5. स्वतःची नृत्य संस्थाही सुरू करू शकता.

6. रिऑलिटी शो हेही नृत्य कलाकाराला स्वतःला सिद्ध करण्याचे एक माध्यम बनले आहे.

👀 नृत्य दिग्दर्शकाला आहे मागणी : सिनेमा, नृत्य अकादमी या क्षेत्रात नेहमीच नृत्य दिग्दर्शकाची मागणी असते. नृत्य दिग्दर्शन (कोरियोग्राफी) शिकण्यासाठी नृत्य संस्थांमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे.

💁‍♂️ नृत्य प्रशिक्षण संस्था खालीलप्रमाणे :

● संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली.
● नाट्यय़ इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक, बंगलोर.
● स्कूल ऑफ फाईन आर्टस, इंदूर.
● महात्मा गांधी मिशन संगीत अकादमी, औरंगाबाद.
● शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.