💥 बीड ब्रेकिंग न्युज : आष्टी तालुक्यात खून


बीड जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरुच असून आज आष्टी तालुक्यातील कानडी (बु.)म ध्ये एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
 Beed Breaking News: Murder in Ashti taluka
आष्टी तालुक्यातील कानडी बु. येथील संजय सुखदेव वळवले यास आज सकाळी अज्ञात तीन ते चार युवकांनी येऊन बेदम मारहाण केली.

या मारहाणीमध्ये संजय वळवले हे मृत्युमुखी पडले. मारेकरी फरार असून आष्टी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. बीड जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरुच आहे.