💥 माजलगावचे बीडीओ सक्तीच्या रजेवर; बदलीचाही ठराव मंजुर
👉 माजलगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेची MREGS कामे सुरु नाहीत. पदाधिकार्यांनी वारंवार सूचना करुनही गटविकास अधिकार्यांनी कसलीही कार्यवाही केली नाही.
👉 हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत आला. त्यांना माजलगावचे गटविकास अधिकारी BDOबी.टी.चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठवून बदलीचाही ठराव मंजुर झाला आहे.
👉 येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण हे रोजगार हमी योजनेंतर्गत कामांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वारंवार सूचना करुनही ते कामे करत नाहीत.
👉 परिणामी, माजलगाव तालुक्यात शेत रस्ते, विहीर व इतर कामे होत नसल्याने विकास कामास गती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बदलीचा ठराव जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी मांडला.
👉 हा ठराव सर्वानुमते मंजुर झाला असून त्यांना तातडीने गटविकास अधिकार्यांना सक्तीच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले आहेत.
👉 दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा