जशी पण आहे तुझीच तर आहे As it is, it is yours


( रात्रीचे 12 वाजता )
तो : Hiiiiiii.
ती : Hello बाबू.
तो : कशी आहेस पिल्लू ?.
ती : बिलकुल माझ्या शोना सारखी, एकदम मस्त.
तो : मग, माझ्या पिल्लूने जेवण केले ?
ती : नाही बाबू, आज मन नाही करत जेवण करायला, म्हणून नाही केले.
तो : अच्छा, जेवायला कधी मन होतं तुझं ?.
ती : असे का बोलतो आहेस शोना, रोज तर जेवण करते आणि तू सांगितल्यापासून 3 चपाती खाते नाहीतर 2 पण नीट खात नव्हते.
तो : चल, जास्ती नौटंकी झाली तुझी आताच्या आता जाऊन जेवण करून ये.. ओके ?.
ती : काय... वेडा झाला आहेस काय.. इतक्या रात्री जेवण ? आता तर किचनमध्ये पण नसेल काही खाण्यासाठी.
तो : मला काही नाही माहित, बस तू जेवण करून ये नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी.
ती : ओय.. असं नको ना बोलु थांब मी चेक करते.. बहुतेक बिस्कीट नाहीतर दुसरे काही असेल तर खाईन ओके.
तो : हम्म्म.. गुड गर्ल..
( 5 मिनीटांनंतर ).
ती : हो.. झाले माझे जेवण पूर्ण च्या पूर्ण 5 बिस्कीट खाले.
तो : बस 5 ? okkk Gn Sd Tc.. Bye
ती : शोना रागावतोस कशाला ? नेहमी ब्लॅकमेल करत असतोस मला, अच्छा थांब.. अजुन खाऊन येते आज तर मला मोटु बनवूनच सोडशील..
( 5 मिनीटांनंतर ).
ती : हे घे आता पूर्ण 10 बिस्कीट्स खाल्लीत, आता खुश ?.
तो : हां ना आणि तू औषध घेतली की नाही?.
ती : सॉरी शोना परत विसरले.
तो : मी आता तुझ्याशी नाहीच बोलणार..
ती : आव्व्.. तु चिडतोस तेव्हा पण किती क्युट दिसतो.
तो : ओह हो.. तु पागल नही सुधरेगी.. टेढी है पर मेरी है.
ती : हो रे.. जशी पण आहे तुझीच तर आहे.