🤔 राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती)


⚡ या योजनेतून पीजीएस प्रणाली पध्दतीने सेंद्रीय शेती करुन तिचे प्रमाणीकरण करून सेंद्रीय शेतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकास विषमुक्त सेंद्रीय शेती उत्पादने उपलब्ध करुन देणे, शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व जमिनीचा पोत सुधारणे आदींसाठी ही योजना राबविली जाते.

🧐 योजनेच्या प्रमुख अटी :

▪ 50 एकर क्षेत्राचा 50 शेतक-यांचा एक गट तयार करणे.
▪ गटामध्ये भाग घेणा-या शेतक-याने तीन वर्षे सेंद्रीय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक.
▪ एक शेतक-यास 1 एकर व जास्तीत जास्त 2.5 एकर पर्यत लाभ घेता येतो.
▪ रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतक-यांनी लिहून देणे बंधनकारक.
▪ यापूर्वी सेंद्रीय शेती कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतक-यांना प्राधान्य दिले जाते.
▪ एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य. त्यात महिला बचतगट, शेती महिला मंडळ, यांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे इतर 50 एकराचे गट करताना त्यामध्ये 16 % अनुसुचित जाती व 8 % अनुसुचित जमातीच्या शेतक-यांची निवड करावी.
▪ गटात समाविष्ट होणा-या शेतक-याकडे किमान दोन जनावरे असावेत.
▪ शेतक-याचे बँक खाते असणे आवश्यक.
▪ कोरडवाहू व बागायती क्षेत्राचा स्वतंत्र गट करावे. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्राला प्राधान्य दिले जावे.
▪ प्रत्येक लाभार्थीने दरवर्षी माती, पाणी तपासून घेणे बंधनकारक.
▪ अपारंपारिक उर्जास्त्रोताचा वापर करणा-या लाभार्थीस प्राधान्य.
▪ एक गट / समूह शक्यतो भौगोलिक व दळणवळणच्या दृष्टीने सोयीचे असलेल्या क्षेत्रातील असावा.
▪ आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात / राज्यामध्ये प्रादेशिक परिषदेच्या मदतीने गट तयार करणे.

📄 आवश्यक कागदपत्रे :

✔ जमिनीचा 7/12 उतारा,
✔ बँक पासबुकची सत्यप्रत,
✔ रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र
✔ जातीचा दाखला आदी.

💁‍♂ लाभाचे स्वरूप असे :

शेतक-यांना सेंद्रीय शेती प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, शेतक-यांने स्वत: सेंद्रीय निविष्ठा तयार करणे, सेंद्रीय निविष्ठा पुरवठा, सेंद्रीय उत्पादीत माल वाहतूक भाडे, अवजारे भाडयाने घेणे, सेंद्रीय शेती उत्पादीत मालाचे प्रमाणिकरण करणे आदी स्वरुपात शेतक-यांना लाभ दिला जातो.

💰 अनुदानाची मर्यादा: 50 शेतकरी 50 एकर क्षेत्राचे एका गटासाठी प्रथम वर्ष 7.067 लाख रुपये, व्दितीय वर्ष 4.98 लाख रुपये आणि तृतीय वर्ष 2.89 लाख रुपयांप्रमाणे देय राहील.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय (सर्व)

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)