💥 चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार


⚡ भारत-चीन मधील वाढत्या तणावाचे परिणाम सीमेवर व तसेच बाजारपेठेवर पडलेले दिसत आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याचे काम सरकारने सुरु केलेलं आहे.

🧐 'तो' करार रद्द : 

👉 देशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं ज्या चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देण्यात आली आहेत. त्यासंबंधितील करार रद्द करण्याची सहमती देण्यात आली आहे.

💁‍♂️ भारतीय रेल्वेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सीआरएससी ही एकमेव चिनी कंपनी होती. चीनच्या हेकेखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार काही महत्वाच्या योजना आखत आहे.

🗣️ त्यानुसारच भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही सरकारी कंपन्यांनाही चीनी समान वापरू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

📍 यात सरकारच्या मालकीच्या बीएसएनएल लाही नवीन प्रणाली बसवताना चिनी सामान न वापरण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.