💥 129 स्वॅब तपासणीसाठी...


धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रूग्ण माजलगाव येथील एका खासगी रूग्णालयात निमोनिया सदृश्य आजाराने उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. मात्र त्यांनी आपण मुंबईहुन आलोत ही माहिती आरोग्य प्रशासन यांच्याकडे लपवून ठेवल्याने आणि नंतर हा रूग्ण ज्या खासगी रुग्णालयात होता.

त्या खासगी रूग्णालयातील दाखल 58 रूग्णांचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत. या 58 स्वॅबसह जिल्ह्यातील एकूण सर्वात मोठा आकडा म्हणजे 129 स्वॅबची तपासणी आज करण्यात येणार असून माजलगावसह जिल्हावासियांच्या आज येणार्‍या या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी किमान कालचा दिवस अपवाद सोडला तर कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आज या 129 मध्ये काय अहवाल येतो?  याच्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने आरोग्य प्रशासनाला माहिती लपवत निमोनीया  आजारावर माजलगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते.

मात्र दोन दिवस उपचार घेवून हा रूग्ण बरा होत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी हा रूग्ण मुंबईहून आल्याचे संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या लक्षात आणुन दिले.

त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नातवासह त्याच्याघरातील 4 व्यक्ती कोरोना रूग्णाच्या पॉझिटीव्ह आढळून आल्या. मात्र या रूग्णाने चार दिवस या खासगी रूग्णालयात उपचार घेतल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्यादिवशी अ‍ॅडमिट असलेल्या सर्वच रूग्णांचे स्वॅब तपासण्याचा निर्णय घेतला. त्यातून काही रूग्णांची सुट्टीही झाली होती.

मात्र त्यांच्याशी संपर्क करून या रूग्णालय संदर्भातील 58 संबंधित व्यक्तींचे स्वॅब हे प्रशासनाने कोरोना आजाराच्या तपासणीसाठी पाठवले आहे.

त्यामुळे माजलगाव शहर आणि या रूग्णालयात उपचार घेणार्‍या सर्वच रूग्णांची धाकधुक वाढलेली आहे. असे असतांनाच जिल्हाभरातुनही आज मोठ्या प्रमाणात रूग्णांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे.

त्यामध्ये बीड येथून 57, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून 1, केज येथील उप जिल्हा रूग्णालय 1, आष्टी ग्रामीण रूग्णालयातून 7 आणि उपजिल्हा रूग्णालय परळी येथील 5 असे एकूण जिल्हा आरोग्य प्रशासनाने 129 रूग्णांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठवले आहेत.