🚑 बीडमध्ये रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक

Transport of liquor by ambulance to Beed

divya marathi beed

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यातही अवैध दारू विक्रेत्यांचा मात्र सुळसुळाट सुरु आहे. प्रत्येकवेळी दारू वाहतूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे.

कधी पाण्याच्या जारमधून काही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारूची वाहतूक केली जात आहे. मात्र चक्क रुग्णवाहीकेतून दारूची वाहतूक केल्याचे समोर आले आहे.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
बुधवारी (दि.20) सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नगर रोडवर गस्त घालत असताना त्यांना म्हसोबा फाटा परिसरामध्ये एका रुग्णवाहिकामध्ये विदेशी दारु आढळून आली. सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
या रुग्णवाहिकेमध्ये 180 मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर वन व्हिस्की विदेशी दारूच्या 96 बाटल्या दोन खोक्यांमध्ये ठेवलेल्या आढळून आल्या. वाहन चालक विशाल गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
14 हजार 400 रुपयाच्या विदेशी दारूसह मारुती ओम्नी कार असा एकूण एक लाख 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बीड समाधान शेळके, जवान अमिन सय्यद, सचिन सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर