💥 आरोग्य सर्वेसाठी गेलेल्या नर्सला शिवीगाळ


माजलगाव बातम्या : तालुक्यातील कंटेनमेंट झोन{containment zone}असलेल्या नित्रुड येथे आरोग्य विभागाकडून तपासणी चालू आहे. या दरम्यान सोमवारी तपासणीत गेलेल्या परिचारीकेला गावातील सोपान आव्हाड यांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
😇 टीक-टॉकचे रेटिंग सुधारलेच कसे ?
मागील चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे आढळल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली होती. त्या दिवसापासून येते, त्यामुळे आरोग्य विभागाकडून मागील चार दिवसांपासून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. या कामी आरोग्य विभागाने वेगवेगळे पथके नेमलेली नेमली असून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे.
💁‍♂️ गेवराई तहसिलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
दरम्यान दि. 25 सोमवारी आरोग्य विभागाचे पथक सोपान आव्हाड यांच्या घरी गेले असता त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यास शिवीगाळ करत हाकलून दिले. हा प्रकार चक्क पोलीस कर्मचार्‍यासमोर घडल्याने आरोग्य कर्मचारी हतबल झाले असून नाराजी व्यक्त करत आहेत.
💥 हडपसरमध्ये पुन्हा खून....
सदर व्यक्ती हा कोरोना रुग्ण आढळलेल्या लोकांच्या घराशेजारी असल्याचे हे समजते. याप्रकरणी आरोग्य विभागाकडून दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर