क्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक पण मिळवा - Pay credit card and get cashback

अपन आज शिकनार आहोत
क्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक पण मिळवा 
तर चला मग लगेच शिकुया



आजवर क्रेडिट कार्डच पेमेंट म्हणजे एक कटकटच समजली जात होती. अनेकदा पेमेंटची तारीख लक्षात नसल्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. तसेच क्रेडिट कार्डच पेमेंट करण्यासाठी खूप मर्यादित पर्याय उपलब्ध होते. यावरच पर्याय म्हणून फ्रीचार्जचे फाउंडर कुणाल शाह CRED नावाची एक नवीन भन्नाट स्टार्टअप घेऊन आले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून CRED ॲप उपलब्ध असले तरी ते बीटा व्हर्जनमध्ये होते आता ते पूर्णपणे सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने डेबिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेमेंट करता येणार आहे. विशेष म्हणजे यात पेमेंट केल्यावर जितक्याच पेमेंट केलं तितके CRED Coins मिळतात. हे CRED Coins वापरून तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन मर्चंडचे कुपन कोड मिळवू शकता.

CRED Coins वापरून तुम्हाला कॅशबॅक देखील मिळू शकतो. यात मला स्वतःला १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक अनेकदा मिळाला आहे. हा कॅशबॅक सरळ तुमच्या क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये जमा होणार आहे. तसेच या CRED Coins वापरून तुम्ही GiveIndia सारख्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत देखील देऊ शकता.

CRED ॲपच्या नवीन अपडेटमध्ये आता तुम्हाला तुमच्या व्हाट्सॲपवर तुमच्या क्रेडिट कार्डचे अपडेट मिळणार आहेत. केवळ या ॲपमधून पेमेंट करतांना ३ दिवस आधी करावे जेणेकरून काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला पेमेंट बाउंस चार्जेस लागणार नाहीत.