💥 अल्पवयीन मुलीचा विनयभंग....
माजलगाव बातम्या: तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच युवकाने विनयभंग केला. तसेच तिच्या वडीलांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीवर दिंद्रुड पोलीसात विनभंगासह अॅट्रासिटीचा सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
😇 टीक-टॉकचे रेटिंग सुधारलेच कसे ?
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील 16 वर्षीय मुलगी एकटीच तिच्या घरासमोर भांडे घासत होती. यावेळी नामदेव महादेव घायतिडक यांच्या सालगडयाचा मुलगा गणेश याने दि. 21 गुरुवारी तेथे येवून अंगावर चिठ्ठी टाकत हात धरत म्हणाला की, तू चिठ्ठी घे नसता मी बळजबरी करील. पिडीतेने चिठ्ठीवरील नंबरवर फोन केला असता गणेश म्हणाला तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नसता तुझ्या आई, वडील, भाऊ यांना मारुन टाकील असे धमकावले.
💥 हडपसरमध्ये पुन्हा खून....
त्यानंतर रविवारी दि. 24 रोजी गणेश याने फोनवर पुन्हा पिडीतेस भेटण्याची मागणी केली. यावर घाबरुन पीडितेने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. यावर गणेश घरासमोरुन जात असताना पीडितेच्या वडीलाने त्यास मुलीस का ञास देत आहे, असे विचारले असता, त्याने त्रास देणारच आहे काय करायचे ते करा असे म्हणून निघून गेला.
💥 आरोग्य सर्वेसाठी गेलेल्या नर्सला शिवीगाळ
दरम्यान पीडितेचे वडील नामदेव घायतिडक यांच्याकडे घडलेला प्रकार सांगावयास गेले. यावेळी नामदेव घायतिडक, महेश घायतिडक व गणेशचे वडील त्यांच्याच अंगावर धावून आले. जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
💁♂️ गेवराई तहसिलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
यावरुन वरील चौघा विरुध्द दिंद्रुड पोलीस ठाण्यात सोमवारी विनयभंगासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले करत आहेत.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर
टिप्पणी पोस्ट करा