😱 औरंगाबादेत दिवसभरात कोरोनाचे चार बळी



 Corona Live | Update 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.
💥 बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ
बुधवारी दिवसभरात आणखी चार रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादेत मृतांचा आकडा 63 वर पोहोचला आहे.
💻वाढत्या स्क्रीनटाइमवर ठेवा नियंत्रण
शहरातील इंदिरानगर येथील 56 वर्षीय पुरुष यांना 25 मे रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, खोकला व दम लागणे अशी लक्षणे होती.
📃 MHT-CET 2020: अर्जांना १ जूनपर्यंत मुदतवाढ
त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार ही होते. 25 मे रोजीच उपचारादरम्यान त्यांचा रात्री साडे अकरा वाजता मृत्यू झाला. त्यांचा अहवाल 26 मे रोजी सायंकाळी उशिरा पॉझिटिव्ह आला आहे.
📃 MHT-CET 2020: अर्जांना १ जूनपर्यंत मुदतवाढ
38 वर्षीय पुरुष रा. हुसेन कॉलनी यांना घाटी रुग्णालयात 25 मे रोजी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. त्यांना खोकला, ताप, दम लागणे असा त्रास होता.
[Dainik Karyarambh]
त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. त्यांना दोन्ही फुफुसाचा निमोनिया झाला होता. 26 मे रोजी रात्री साडे सात वाजता त्यांचा मृत्यू झाला.

तसेच माणिकनगर, गारखेडा भागातील 76 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व मकसूद कॉलनीतील 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे आज सकाळी मृत्यू झाला आहे, त्यामुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर