🤩 उंच दिसण्यासाठी फॅशन ट्रिक्स


सेलिब्रेटी आणि त्यांची फॅशन स्टाईल पाहून वाटते. आपणही ट्राय करायला काय हरकत आहे. मात्र अनेकदा यावेळी उंची मॅटर करते.  अशावेळी उंच दिसण्यासाठी कपडे कसे निवडाल? याबाबत पाहुयात..

हाय वेस्ट जिन्स : सध्या या जिन्सची फॅशन सुरु आहे. अशात तुम्हाला उंच दिसायण्यासाठी हि जिन्स फायदेशीर ठरेल.

पलाझो : हा देखील एक उत्तम पर्याय आहे. पलाझो तुमच्या कॅज्युअल लूक प्रमाणेच सण समारंभारतही कुर्तीसोबत टीम अप करू शकता.

फ्लोअर लेन्थ अनारकली किंवा गाऊन : प्रामुख्याने विविध समारंभांमध्ये खास डिझायनर कपडे निवडले जातात. अशामध्ये अनारकली ड्रेस, गाऊन हे उत्तम ट्रेडिशनल कपडे आहेत. मात्र यांची निवड करताना पायापाशी फार जड इम्रोडरी असणार नाही याची काळजी घ्या.

हिल्स : उंच दिसण्यासाठी हा एक पर्याय आहे. मात्र सतत किंवा प्रमाणापेक्षा अधिक वापराने धोकादायक आहे.

'या' चूका टाळा! : बुटक्या किंवा कमी उंचीच्या मुलींना स्ट्रेट कटमधील लेन्थ कुर्तीज, पंजाबी ड्रेस टाळावेत.