💥 22 जणांविरुद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल


अंबाजोगाई : ऑटो रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी 22 जणांविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (एट्रासिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी गुरुवारी कालिदास विश्वनाथ हजारे या मातंग समाजाच्या ऑटोरिक्षा चालकासोबत ऑटो रिक्षाचे भाडे देण्यावरून भांडण झाले व या भांडणाचे रूपांतर पुन्हा याच गावातील काही युवकांनी एकत्रित होऊन कालिदास हजारे यांच्या घरावर चालून येऊन अर्वाच्च भाषेत व जातीवाचक शिवीगाळ करून, घरातील महिलेचा विनयभंग करून घराचा दरवाजा मोडून घराच्या पत्र्यावर दगड मारले.
या कारणास्तव कालिदास हजारे यांच्या फिर्यादीवरून शंकर प्रसाद भगत, कृष्णा बाबुराव भगत, तुकाराम मंचक भगत, रवी साखरे, कृष्णा ढवारे, अजित भगत, सत्यजित भगत, नरसिंग भगत, मयूर भगत, गोपाळ भगत, आदित्य जाधव, अंगद भगत, अशोक जाधव, ईश्वर गायके, नामदेव शेवाळे, पांडुरंग शेवाळे, सुशील भगत, राजाभाऊ भगत, मिठु जाधव, महेश साखरे, नवनाथ साखरे, विजय भगत आदी 22 जणांच्या विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत असुन त्यांना पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे सहकार्य करत असुन आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर