फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कस करायच ? Facebook account surkshit kase karayach

अपन आज शिकनार आहोत
फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कस करायच ?
तर चला मग लगेच शिकुया

सारे शिकुया पुढे जाउया


सध्या फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे. फेसबुकच्या फायद्यांसोबतच त्याचे तोटे हि दिवसेंदिवस समोर येत आहेत. जगभरात अनेक विधायक कामांसाठी फेसबुकचा वापर झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. याउलट फेक अकाउंटवरून महिलांची बदनामी करणं, इनबॉक्समध्ये लोचटपणा करणे अशा अनेक घटना देखील रोजच समोर येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी फेसबुकतर्फे अनेक सेटिंग्स आधी पासून देण्यात आल्या आहेत. आजच्या लेखात याच्याविषयी लिहणार आहे.

सेटिंग ओपन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – www.facebook.com/setting

१. जनरल अकाउंट सेटिंग

या सेटिंगमधून प्रोफाइलचे नाव, ई-मेल आयडी, युजर नेम यासोबत पासवर्ड बदलता येतो. मॅनेज अकाउंट या ऑप्शनमध्ये असलेल्या ‘युवर लेगसी कॉन्टॅकट’द्वारे आपल्या मृत्यूनंतर आपले अकाउंट कोण मॅनेज करू शकत हे ठरवता येते. आपल्या फ्रेंड लिस्टमधील एखाद्याला आपण याविषयीचे अधिकार देऊ शकतो.

२. प्रायव्हसी सेटिंग आणि टूल्स


या सेटिंगद्वारे आपण आपल्या पोस्ट कोणाला दिसाव्यात, आपली फ्रेंड कोणाला पाहता यावी, ई-मेल आयडी अथवा मोबाईल नंबरच्या मदतीने आपल्याला कोण सर्च करू शकत, गुगल व इतर सर्च इंजिन्समध्ये आपली प्रोफाइल दिसावी कि नाही हे सर्व ठरवता येत. यातील सेटींगन्स फ्रेंड ऑन्ली केल्याने अनोळखी लोकांचा त्रास टाळता येऊ शकतो.

३. टाइमलाईन आणि टॅगिंग सेटिंग

फेसबुकवर सर्वात जास्त इरिटेड करणारी गोष्ट म्हणजे आपला काही एक संबंध नसणाऱ्या फोटोत टॅग करणं. या सेटिंगद्वारे आपल्या टाइमलाईनवर कोण पोस्ट करू शकत, आपल्या टाइमलाईन वरील गोष्टी कोणाला दिसाव्यात, कोण टॅग करू शकत हे सर्व ठरवता येत.

४. मॅनेज ब्लॉकिंग




या सेटिंगमधून तुम्ही एखाद्या मित्राला रिजेक्शन लिस्टमध्ये टाकू शकता, एखादा व्यक्ती, पेज, ग्रुप, इव्हेन्ट तसेच ॲप ब्लॉक करू शकता.

५. मोबाईल सेटिंग्स


अनेकदा आपल्या मित्राकडे आपला मोबाईल असतो. गमतीने अथवा जाणीवपूर्वक त्या मित्राकडून आपल्या फेसबुक अकाऊंचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचसाठी या सेटिंगमध्ये असणारे मोबाईल पिन हे ऑप्शन उपयोगाचे आहे. फेसबुकच्या पासवर्ड व्यतिरिक्त आपण यात अजून एक पिन सेट करू शकतो. नवीन स्टेटस अपडेट करतांना अथवा नवीन फ्रेंड ॲड करतांना हा पिन आवश्यक असेल.

६. पब्लिक पोस्ट फिल्टर आणि टूल्स


या सेटिंगमधून आपल्याला कोण फॉल्लो करू शकत, कोण कमेंट करू शकत यावर नियंत्रण ठेवता येतं.

७. ॲप सेटिंग



अनेक वेबसाईट आणि ॲप्समध्ये आता फेसबुक लॉगिनचा पर्याय असतो. एखाद्या चुकीच्या ॲपमध्ये फेसबुकद्वारे लॉगिन केल्यास आपल्या फेसबुक अकाऊंची सुरक्षेत धोक्यात येऊ शकते. यामुळे नियमितपणे हि सेटिंग चेक करणे आवश्यक आहे. एखादे अनोळखी ॲप दिसताच ते डिलीट करावे.

या सर्व सेटिंग केल्यानंतरही आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

१. नियमितपणे पासवर्ड चेंज करणे.

२. ज्या लॅपटॉप अथवा कंप्युटर वरून फेसबुक वापरत असू त्यात अपडेटेड अँटीव्हायरस असायला हवा.

३. अनोळखी अथवा पोर्नोग्राफिक लिंकवर क्लिक करू नये.

४. शक्य असल्यास  कोणत्याही ॲपमध्ये लॉगिन विथ फेसबुक टाळावे.

५. फेसबुक वापरून झाल्यानंतर आठवणीने लॉगआउट करावे.

६. विशेषकरून मुलींनी आपण काय पोस्ट करतोय याचे भान असू द्यावे. पब्लिक डोमेनमध्ये असणाऱ्या फोटोंचा दुरुपयोग करणे सहज शक्य आहे.


हेही वाचा  : आजीबाईचा बटवा - बाल अरोग्य


                   नवजात बालकाची काळजी

हिंदी अर्टीकल  :


क्या मैं घर बैठे पैसे कमा सकता हूं ?

फ्री ब्लॉग / वेबसाइट कैसे बनाये हिंदी में (Complete Guide)

On Page SEO क्या है ?



तरी पण  काही शंका असल्यास कमेंट करा. अपला भाउ आहे ना प्रोब्लेम स्वल करयला तर मग शेर करा अपल्या लंगोटी  मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !