प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स - extension blogger

गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील क्रोमच वापरतो. क्रोममध्ये एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करून तुम्ही क्रोम अधिक प्रभावीपणे वापरू शकता. सध्या लाखो एक्सटेंशन क्रोम वेब स्टोरवर मोफत उपलब्ध आहेत.

क्रोम एक्सटेंशन म्हणजे काय नेमक ?

एक्सटेंशन म्हणजे एक छोटा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्राऊजरचे फीचर्स वाढवू शकता. वर्डप्रेसमधील प्लगइनप्रमाणेच क्रोम एक्सटेंशन काम करतात. HTML, JavaScript आणि CSS च्या मदतीने ब्राऊजर एक्सटेंशन काम करतात. हे एक्सक्टेन्शन .crx फॉरमॅटमध्ये असतात. क्रोम वेब स्टोरमधून तुम्ही हे एक्सटेन्शन्स डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता.

या ब्लॉगमध्ये आपण ब्लॉगरला उपयोगी ठरतील आणि त्यांनी वापरायलाचे हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स जाणून घेणार आहोत.

व्यक्तिगत हे माझे सर्वात आवडते एक्सटेंशन आहे. खूपदा आपल्याला इंग्रजीमध्ये मेल, ब्लॉग अथवा काही सोशल मीडिया पोस्ट लिहायच्या असतात.परंतु इंग्रजी ग्रामर बरोबर आहे कि नाही याविषयी आपल्याला शंका असते. अशा वेळी हे Grammarly फार उपयोगी ठरते.

ब्राउझरमध्ये तुम्ही जेथे जेथे टाइपिंग करता अशा जवळपास सर्व ठिकाणी Grammarly काम करते. जिथे चुकलं आहे अथवा काही बदल आवश्यक आहेत ते लाल अंडरलाईनने हायलाईट होतात. बदल का आवश्यक आहे याचे कारण देखील आपल्याला सविस्तर वाचता येते. मोफत व प्रीमियम अशा दोघ व्हर्जनमध्ये Grammarly उपलब्ध आहे.



२. Google Input Tools

गेल्या काही महिन्यांपूर्वी गुगलने त्यांचे विंडोजवरील ऑफलाईन इनपुट टूल बंद केले आहे. यामुळे भारतीय भाषांमध्ये ब्लॉगिंग करणाऱ्यांची अडचण होत होती. त्याला पर्याय म्हणून हे क्रोम एक्सटेंशन आहे. विंडोज काम्पुयटरवर माइक्रोसॉफ्ट भाषा सारखे अनेक पर्याय आहेत. परंतु जर तुमच्याकडे मॅक अथवा लिनक्स असेल तर गुगल मराठी इनपुट हे तुमच्या फार उपयोगी आहे.


३. Buffer

र्स असाल किंवा डिजिटल मार्केटिंग करत असाल तर एका वेळी अनेक सोशल अकाउंट्स सांभाळावे लागतात. यासाठीच Buffer हे सोल्युशन आहे. याच्या मदतीने तुम्ही एकावेळी ३ सोशल अकाउंट्स मोफत अपडेट करू शकता. परंतु याहून अधिक अकाऊंट्सवर एकावेळी पोस्ट करण्यासाठी तुम्हाला त्यांचे विकत असलेले प्लॅन्स घ्यावे लागतील.



४. EverNote Web Clipper

EverNote तर तुम्ही सर्वांनी वापरलच असेल. अनेकदा ऑनलाईन वाचत असतांना काही महत्त्वाचं असं आपल्या वाचण्यात येत. अशा वेळी EverNote Web Clipper च्या मदतीने तुम्ही त्याला हायलाईट करून ठेवू शकता, स्क्रिनशॉट काढून ठेऊ शकता. तसेच नंतर तुम्हाला हवं तेव्हा तुमच्या EverNote अकाउंटच्या मदतीने कोणत्याही डिव्हाइसवरून सहजपणे वापरू शकता. संपूर्ण वेबपेज बुकमार्क करून ठेवण्यापेक्षा आपल्याला हवा तितका मजकूर हायलाईट करणे कधीही सोईस्कर आहे.



५. Awesome Screenshot: Screen Video Recorder

खूपदा एखाद्या वेबपेजचा आपल्याला स्क्रिनशॉट काढायचा असतो. परंतु विंडोजमध्ये Print Screen (PrtScn) किंवा मॅकमध्ये command + shift + 3 च्या मदतीने केवळ स्क्रीनवर दिसणारा भागच कॅप्चर होतो. संपूर्ण वेबपेजचा स्क्रिनशॉट घेण्यासाठी हे क्रोम एक्सटेंशन तुमच्या मदतीला येईल. यात तुम्ही व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकता. यातील इनबिल्ट इडिटरच्या मदतीने स्क्रिनवरील संवेदनशील माहिती देखील ब्लर करू शकता.



६. Simple Allow Copy

काही वेबसाईट्स किंवा ब्लॉगवरील माहिती कॉपी करता येत नाही. त्या वेबसाईटवरील कन्टेन्ट कॉपी प्रोटेक्टेड असते. अशा वेळी तुम्ही Simple Allow Copy च्या मदतीने कॉपी करू शकता. बसं या क्रोम एक्सटेन्शनचा इतकाच उपयोग असला तरी अनेकदा फार उपयोगी ठरते. मला हे क्रोम एक्सटेंशन सुरु असल्यावर Gutenberg एडिटरमध्ये काही वेळा अडचण येते. त्यामुळे गरज नसतांना हे एक्सटेंशन बंद करून ठेवा.



७. Forest: stay focused, be present

हे माझे एक अजून आवडते एक्सटेंशन आहे. महत्त्वाचे काम करत असतांना आपण न कळत सोशल मीडिया, यूट्यूब सारख्या वेबसाईटवर केव्हा जातो? हे आपल्या देखील कळत नाही आणि त्यावर तासांसात आपण वाया घालवत असतो. अशा वेळी Forest: stay focused, be present च्या मदतीने तुम्ही स्वतःला ब्लॉग लिहताना किंवा काम करत असतांना फोकस ठेऊ शकतो. एकदा हे एक्सटेंशन नक्की वापरून पहा.


८. Google Dictionary (by Google)

इंग्रजी ब्लॉग्स वाचत असतांना आपल्याला काही शब्दांचा अर्थ माहित नसतो. दर वेळी गुगलवर किंवा डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधणं कटकटीचा ठरत. अशा वेळी Google Dictionary (by Google) ने तुम्ही लगेचच त्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ शकता. त्या शब्दाचा उच्चार कसा करावा हे देखील ऐकू शकता.




९. ColorZilla

एखाद्या वेबपेजवरील रंगसंगती आपल्याला खूप आवडते मात्र त्याचा HTML कोड आपल्याला माहित नसतो. त्या वेबपेजवरील अतिशय अचूक एचटीएमएल कोड जाणून घ्यायचा असल्यास ColorZilla हे अतिशय उपयोगी एक्सटेंशन आहे. यात तुम्हाला वेबपेजवरील हव्या त्या पिक्सलचा HTML Color Code जाणून घेता येतो.



१०. Scan WP – Detect WordPress Themes and Plugins

आपल्याला एखाद्या ब्लॉगची थीम अतिशय आवडते. तुम्हाला त्या ब्लॉगर वापरलेली थीम आणि प्लगिन विषयी जाणून घ्यायचे असते. Scan WPच्या मदतीने तुम्ही हे अतिशय सहाजनपणे करू शकता. यात त्या ब्लॉगवर ऍक्टिव्ह असणाऱ्या वर्डप्रेस थीम, प्लगिन्स कोणते हे जाणून घेता येते.


चेतावनि :  जास्त एक्सटेंशन इन्स्टॉल करु नका तुमचे ब्राउझर हळु होऊ शकते. त्यामुळे काय खायच तेवढेच खा /एक्सटेंशन तुमच्या गुगल क्रोममध्ये इन्स्टॉल करा.



काही शंका असल्यास कमेंट करा. अपला भाउ आहे ना प्रोब्लेम स्वल करयला तर मग शेर करा अपल्या लंगोटी  मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !