मस्त मस्त १6न्यूजपेपर थीम / मॅगझीन वर्डप्रेस थीम top 6 News paper Theme



वर्डप्रेसवर न्यूजपोर्टल सुरु करणे अतिशय सोपे व कमी खर्चिक आहे. माझ्या ब्लॉगवर याआधी मी वर्डप्रेसवर वेबसाईट कशी सुरु करावी याविषयी लिहले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण न्यूजपोर्टलसाठी चांगल्या व मला स्वतःला आवडणाऱ्या १० थीम्स पाहणार आहोत.

News Paper 9


Newspaper हि थेमेफॉरेस्ट ThemeForest वरून मॅगझीन कॅटेगरीमधून सर्वाधिक विकत घेतलेली थीम आहे. नियमित अपडेटसाठी हि थीम प्रसिद्ध आहे. ५० हुन अधिक डेमो यावर उपलब्ध आहेत. यात तुम्ही न्यूजपेपर, रिव्ह्यू वेबसाईट, ब्लॉग यासारख्या वेबसाईट अतिशय उत्तमपणे बनवू शकता.

यासोबत तुम्हाला ८ प्रीमियम प्लगिन मोफत मिळतात. जेटपॅक, WooCommerce, WPML, bbPress, Contact Form 7 यासारख्या सर्व प्रसिद्ध वर्डप्रेस प्लगिन्ससोबत हि थीम सुसंगत आहे.

यात इनबिल्ट रिव्ह्यू सिस्टीम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कोणत्याही गोष्टींचे रिव्ह्यू अतिशय पद्धतशीरपणे दाखवू शकता. यात असंख्य फॉन्ट्स असून यासोबत तुम्ही गुगल फॉन्ट्स देखील वापरू शकता.

नवीन व्हर्जनमध्ये WPBakery Page Builder for WordPress ऐवजी त्यांचे स्वतःचे tagDiv Composer हे पेज बिल्डर वापरावे लागते. व्यक्तिगत मला ते मुळीच आवडलेलं नाही.

Newspaper थीम सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) साठी पूर्णपणे सुसंगत आहे. तसेच कोडींग देखील ऑप्टिमाइझ असल्याने यावर लोडींग स्पीड देखील चांगला आहे.

JNews


JNews हि वर्डप्रेससाठीची मला सर्वात जास्त आवडणारी मॅगझीन प्रकारातील थीम आहे. माझा स्वतःचा ब्लॉग देखील याच थीमवर आहे.

पेज बिल्डर म्हणून यासोबत तुम्हाला WPBakery व Elementor हे दोघ प्रसिद्ध प्रीमियम प्लगिन्स मोफत मिळतात. तसेच YellowPencil हे Visual CSS Editor हे प्लगिन देखील मोफत मिळते.

अतिशय सुटसुटीत आणि स्वच्छ लेआऊट असणारी JNews थीम SEO साठी सुसंगत असल्याचा दावा थीम डेव्हलपरकडून करण्यात येतो. यात तुम्हाला इनबिल्ट Google AMP सपोर्ट मिळत असल्याने तुम्ही AMP मोडमधील रंगसंगती सहजपणे बदलवू शकता.

JNews सोबत तुम्हाला Infinite Scroll, Review System, View Counter, Frontend Submit यासारख्या सुविधा मिळतात.

MH Magazine


MH Magazine हि सुद्धा माझी एक आवडती वर्डप्रेस थीम आहे. जर तुम्ही तुमच्या वेबसाइटवर जास्त खर्च करू शकत नसाल तर MH Magazine Lite हे मोफत व्हर्जन देखील तुम्ही वापरू शकता.

अतिशय सुटसुटीत आणि सोपी असणारी हि थीम मोबाईल रिस्पोन्सिव्ह देखील आहे. तुम्ही नवीनच वर्डप्रेस शिकत असाल तर तुम्ही या थीम पासून सुरवात करावी असा सल्ला मी तुम्हाला देईल.

जर तुम्ही MH Magazine चे प्रीमियम व्हर्जन विकत घेतल्यास त्यात तुम्हाला Google Webfonts, चाईल्ड थीम यासारखे फीचर्स मिळतील.

Colormag theme



ColorMag हि थीम मोफत आणि विकत अशा दोघ पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर काही जास्त खर्च करायचा नसल्यास तुम्ही ColorMag चे मोफत व्हर्जन नक्कीच वापरून पाहायला हवे.

यात तुम्हाला फॉन्ट्स किंवा काही विजेट्स हवे असल्यास ColorMag चे प्रीमियम व्हर्जन विकत घ्यावे लागेल.

Sahifa


Sahifa हि एक साधी सोपी आणि थीमफॉरेस्टवरील बेस्ट सेलर थीम आहे. आजवर १० हजारांपेक्षा जास्त लायसन्स विकले गेले आहेत.

WooCommerce सोबत हि थीम सुसांगत आहे. यात तुम्हाला होमपेज तयार करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी पेज बिल्डर प्लगिनची आवश्यकता नाही. यात मेगा मेनू, पोस्टमध्ये स्लाईडशो असे सर्व फीचर्स मिळतात.

Sahifa मध्ये तुम्हाला ३६ प्रकारचे विविधे विजेट्स मिळतात. यात तुम्ही ६५० पेक्षा अधिक गुगल फॉन्ट्स वापरू शकता.


काही शंका असल्यास कमेंट करा. अपला भाउ आहे ना प्रोब्लेम स्वल करयला तर मग शेर करा अपल्या लंगोटी  मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!