फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात मोठा 'राजकीय भूकंप' होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ !

 महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असून फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील सत्ताधारी शिंदे - फडणवीस सरकार कोसळेल असा मोठा डच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. या मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनादेखील बघणार नाही, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, "आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? एक मिनिटही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. म्हणून हे सरकार उलथून टाकण्यासाठी हा इशारा आहे.." असं संजय राऊत म्हणाले आहेत.