गर्दी नको, खोटेपणा नको, बीड दौऱ्यापूर्वी अमित ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना मेसेज

जे पक्षात खरं काम करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मला खोटं चित्र दाखवू नका, आपण आपल्या चुका मान्य केल्या, आपण कुठे कमी पडतोय, हे मान्य केलं, तरच आपण पुढे जाऊ शकतो, हा माझा पहिला मेसेज होता. तो मेसेज देऊनही प्रतिसाद मिळतोय तो अतिउत्तम आहे, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी तरुणांना येणाऱ्या निवडणुकीत संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते बीडमध्ये शहराचं आराध्य दैवत असणाऱ्या कंकलेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी बोलत होते.

मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. परळीतील वैद्यनाथ मंदिरात नतमस्तक होऊन अमित ठाकरेंनी मुंडेंच्या परळीतून या दौऱ्याला सुरुवात केलीय. तर बीडचं ग्रामदैवत असणाऱ्या, कंकालेश्वर मंदिरात जाऊन ते महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभर शासकीय विश्रामगृहात अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून या बैठकीसाठी मराठवाड्यातून विविध पदाधिकारी हजर आहेत.

दरम्यान मी महादेवाचा भक्त आहे, त्यामुळं परळीच्या वैद्यनाथासह कांकालेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात करत आहे. जालना, संभाजीनगरलाही जाणार आहे. माझा हा दौरा संपल्यानंतर मी बारा ज्योतिर्लिंग दर्शन घेणार असल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान या ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

तरुण हे राजकारणातील पहिली पायरी त्यामुळे त्यांना संधी मिळाली पाहिजे. मला गर्दी नको आणि खोटेपणा नको. पक्षात काम करणारे खरे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत, त्यांना भेटायचं आहे. मला खोटं चित्र दाखवू नका, चुका मान्य केल्या, कुठे कमी पडतोय हे समजलं, तर आपण पुढे जाऊ शकतो, हा माझा दौऱ्याला येण्यापूर्वी पहिला मेसेज होता, तो देऊनसुद्धा इतका प्रतिसाद मिळतोय हे उत्तम, असं अमित ठाकरे म्हणाले.