राज्यातील सर्वात मोठी बातमी ! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं



शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं आहे.

आता ठाकरे गट किंवा शिंदे गटाला हे चिन्हा वापरता येणार नाही. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली.

त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती. ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्का सादर केला होता.