शिवसैनिकांचं मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन, उद्धव ठाकरे म्हणाले...

शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि शिवसेना नाव वापरण्यावर निवडणूक आयोगाने मर्यादा आणल्यानंतर आता ठाकरेंना नवी ओळख मिळाली आहे. आता पक्षाचं नाव असेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर निशाणी असेल धगधगती मशाल... निवडणूक आयोगाने जसंही ठाकरेंना मशाल चिन्ह दिलंय तेव्हापासून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गावोगावी मशाल मोर्चे निघतायेत. धगधगती मशाल आता शिवसेनेच्या वाट्याला आलेला अंधार दूर करेल, अशा भावना शिवसैनिक व्यक्त करतायेत. अशा सगळ्या वातावरणात आज अंधेरीच्या शिवसैनिकांनी धगधगती मशाल घेऊन मातोश्रीवर जात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके याच विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. यावेळी अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. मशालीचे तेज आणि महत्व ओळखा, असं सांगत आपले पुढील इरादे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी रात्री उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' हे नाव आणि 'धगधगती मशाल' हे निवडणूक चिन्ह बहाल केले. आयोगाचा निर्णय जाहीर होताच राज्यभरात ठिकठिकाणी शेकडो शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरले. मशाल निशाणी मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी उस्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी शिवसैनिकांनी पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष केला.

आज अंधेरीच्या शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं. शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाची बापाची.... अंधेरी विधानसभा आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची... उद्धव साहाब तुम विशाल हो, हमारी निशाण मशाल हैं... अशा घोषणांनी शिवसैनिकांनी मातोश्रीचा परिसर दणाणून सोडला. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारलं. त्यांना हात जोडून धन्यवाद देत असेच माझ्या सोबत राहा, असं आवाहन केलं. शिवसैनिकांनी आपल्या हाती असलेली मशाल उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. उद्धव ठाकरेंनीही मशाल हाती घेत विजयी भावमुद्रेने स्मितहास्य केलं. अन्याय जाळणारी मशाल आता आपल्याला मिळाली आहे, असं सांगत अंधेरी पोटनिवडणुकीचं रणशिंगच त्यांनी फुंकलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत तथा शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.