गौर गोपाल दास यांनी सांगितली प्रेमाची खरी भाषा
कधी कधी आपल्या मनातील गोष्टी तोंडावर येणं देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमचे एकमेकांवर असणारे प्रेम, कौतुकाचे शब्द, हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये स्थिरता, शांतता हवी असेल तर तुमच्या जोडीदारासाठी कौतुकाचे शब्द नक्की वापरा.
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला कधी न सांगितलेल्या गोष्टी जर केल्या त्याला आपण सेवाभावी कृती म्हणू शकतो. यामध्ये कधी तुम्ही जोडीदारासाठी जेवण,नाश्ता, किंवा आजारपणात त्यांची काळजी घेऊ शकता. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते
कोणत्या कार्यक्रमाला छोट्या-मोठ्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या जोडीदाराला गिफ्ट म्हणून देऊ शकता. पण त्याहून अधीक त्यांचा आदर करणे या गोष्टीमुळे देखील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनामध्ये तुमचे स्थान निर्माण करु शकता.
नातेसंबंध चांगले होण्यासाठी प्रत्येक जोडप्याला सहवास हवा असतो. मात्र हे करताना तुम्ही जोडीदाराला शक्य तेवढा वेळ द्या मग तो फोनवर असेल किंवा एकमेकांच्या सोबत. तुम्ही घालवलेल्या वेळेमुळे तुमचे बॉन्डिंगसुद्धा चांगले होईल.
शारीरिक स्पर्श (physical touch) - पाच भाषांपैकी एक महत्वाची भाषा म्हणजे शारीरिक स्पर्श. प्रेमात एकमेकांचा स्पर्श हा खूप महत्वाचा असतो. तुमचा स्पर्श अनेक भावना व्यक्त करते.
टिप्पणी पोस्ट करा