असा ओसंडून वाहतोय नवनीत राणांच्या चेहऱ्यावर आनंद

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून स्वतंत्रपणे गट स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून संपूर्ण शिवसेना पक्षच जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेच्या (Shivsena) तोंडाला अक्षरश: फेस आला आहे.


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून स्वतंत्रपणे गट स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून संपूर्ण शिवसेना पक्षच जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेच्या (Shivsena) तोंडाला अक्षरश: फेस आला आहे. या सगळ्यातून आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde)किंवा पडद्यामागून त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपला कितपत फायदा होणार, हे माहिती नाही. मात्र, या बंडामुळे शिवसेनेवर ओढावलेल्या गंडांतरामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांना नक्कीच आनंदाचे भरते आले आहे.

काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीस म्हणण्याचा आग्रहामुळे शिवसेनेशी वैर ओढवून घेणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा या दाम्पत्याला शिवसेनेने चांगलाच हिसका दाखवला होता. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली साडेसाती आहेत. त्यांच्या काळात राज्याची पिछेहाट झाली असे, राणा दाम्पत्याने म्हटले होते. यानंतर राणा दाम्पत्याला तब्बल १४ दिवस तुरुंगात खितपत पडावे लागले होते. मात्र, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचे थांबवले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी सुरु असतात.