Today Beed news live वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी 'त्यानं' स्वतःला गाडून घेतलं!

 Today Beed news live

वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी 'त्यानं' स्वतःला गाडून घेतलं!

वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी 'त्यानं' स्वतःला गाडून घेतलं! 

▪️ जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून थकीत वीजबिल वसुलीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याच्या धडाका लावलाय. 

▪️ त्यामुळे शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्यांनं स्वतःला जमिनीत गाडून घेतलंय. 

▪️ जाफ्राबाद तालुक्यातील खामखेडा येथे या कार्यकर्त्यानं स्वतः ला गाडून घेत महावितरण कंपनीविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 

▪️ दरम्यान, मयूर बोर्डे असं या कार्यकर्त्यांचं नाव असून जोपर्यंत महावितरण कंपनी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या कार्यकर्त्याने दिला.