Today Beed news live बीएससी व एमएससी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

 Today Beed news live बीएससी व एमएससी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

● राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 

● मुंबई, संभाजीनगर व नागपूरमध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था आहेत. या संस्थांमधून फॉरेन्सिक सायन्समध्ये बी. एस्सी व एम. एस्सी  पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.  त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

● या सर्व विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या इंटर्नशिपसाठी दरमहा अनुक्रमे प्रत्येकी दहा हजार व पंधरा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (गट-क) व वैज्ञानिक सहायक (सायबर गुन्हे व तासी) (गट-क) या पदासाठी नेमून दिलेली  कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

● इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.