टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या ● तामिळनाडूत लष्कराच हेलिकॉप्टर कोसळलं, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू, तर सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी ● ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, लसीकरणाचा वेग वाढवा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश ● लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातील मृतदेहांची डीएनए चाचणी होणार, घटनेची चौकशी करण्याचे लष्कराचे आदेश ● BSC आणि MSC च्या विद्यार्थ्यांना आता सरकारकडून इंटर्नशिप मिळणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय ● पुण्यात तापमानाचा पारा घसरला; वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती ● पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील काही भागांत गुरुवार, शुक्रवार हे दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद ● पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड ● सोलापूरचे विद्यमान उपमहापौर दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून तडीपार, तर द्वेषापोटी कारवाई केल्याची राजेश काळेंची टीका ● अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या यादीत, एकूण चार भारतीय महिलांचा समावेश! ● ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीच्या पहिल्या दिवशी पाच विकेट घेत इंग्लंड संघाचा डाव फक्त 147 धावात संपुष्टात आणला