पंकजाताई बीडमध्ये अचानक पोहोचल्या पानच्या स्टाॅलवर..!



पंकजाताई मुंडे काल सायंकाळी औरंगाबादहून परळीकडे जात होत्या, बीडमध्ये दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्या पार्श्वभूमी कार्यालयात गेल्या होत्या, पंकजाताई बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजाताईंनी त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! 

Zunjar Neta Marathi News paper beed

पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचीच आठवण आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे आदी यावेळी सोबत होते.