केज तालुक्यात खदानीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे



दि. ८ आठ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायं ४:३० वा. च्या सुमारास साळेगाव येथील दस्तगीरचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या भागात इंगळे यांच्या शेतातील खदानीत पारधी समाजाचे बबन डिगा पवार यांची अल्पवयीन मुले प्रकाश बबन पवार (८ वर्ष) व अनिल बबन पवार वय (६ वर्ष) ही दोन सख्खी भावंडे खेळत असताना एका जुन्या दगड खडणीतील पाण्यात पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, धनपाल लोखंडे, अमोल गायकवाड, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. स्थानिक रहिवाशी व पोलीस तपासात वेळोवेळी मदत करणारे बाळकृष्ण घुले, बापू गिते व रामदास गिते यांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आली. त्या नंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह हे उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान घटनास्थळी मयत मुलांची आई मैनाबाई पवारवडील बबन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकीत होता.