पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार



▪️ कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने नवा विक्रम नोंदवला. 

▪️ देशाच्या कोरोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. 

▪️ यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे.

▪️ सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. 

▪️ मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली जाईल, याबद्दल भाष्य करतील असं म्हटलं जात आहे.