साताऱ्यातील तासवडे टोलनाक्यावर मारहाणीची घटना; प्रवाशांना मारहाण


सातारा जिल्ह्यातील कराड जवळील तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी 6 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ धमकी दिल्याची घटना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जाणून घ्या घटना :

▪️ कोल्हापूरहून साखरपुड्याचा कार्यक्रम करून सोमवारी रात्री बस क्रमांक (एम.एच. 12 केजी 9959) या बसने पुणे येथे निघाले होते. 

▪️ टोलनाक्यावरील 7 नंबर लेन्थवरील बुथवर टोल भरण्यासाठी टोल कर्मचारी फास्टॅग स्कॅनिंग करीत असताना स्कॅनिंग होत नव्हते. 

▪️ यावेळी बस चालक व टोल कर्मचारी यांचे बोलणे सुरू असताना, टोल कर्मचारी बस चालकाला शिवीगाळ करू लागला. 

▪️ यावेळी बसमधील फिर्यादी यांचे नातेवाईक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचारी शिवीगाळ करू लागला. 

▪️ यावेळी बसमधील अन्य नातेवाईक खाली उतरले असता, टोल नाक्यावरील 12 ते 15 जणांनी पळत येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. 

▪️ यासंदर्भात शबाना इलियास शेख ,बहीण रुक्सार,भाऊ रेहान चांद गोलंदाज, मामा शेख महंमद, रफिक बाबू गोलंदाज व अब्दुल सुतार अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शबाना इलियास शेख (रा. आझाद चौक निगडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

▪️ दरम्यान, 12 ते 15 जणांवर तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.