अखेर पापा मोदींच्या हातात घड्याळ, बीडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार



बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.