Good News - बीड जिल्ह्यात मुलींचा जन्म दर वाढला...
● स्त्री भ्रूण हत्येचा काळा डाग पुसून काढण्यात बीड जिल्ह्याला यश आले आहे. कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले ग्रामीण व शहरी भागात जनजागृती केली याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
● २०१५-१६ साली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ८९८ एवढा होता. आता तो वाढून ९४६ वर पोहोचला आहे. महिला बाल कल्याण विभाग व आरोग्य विभागाच्या च्या सर्वेत माहिती समोर अली आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी मुलांची बरोबरी करण्यासाठी नागरिकांनीही मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये, असे आवाहन प्रशासना कडून केले जात आहे.
● पीसीपीएनडीटी कायदा लागू केला. लिंगनिदान करणाऱ्यांसह करून घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. तेव्हापासून आतापर्यंत तरी एकही कारवाई झालेली नाही. मात्र आगरी समाजामध्ये लिंग भेदभाव केला जातो मात्र गुणोत्तराचे प्रमाण जरी समाधानकारक असली तरी ऊसतोड मजूर आणि भटक्या विमुक्त जातीतील लोकांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत करण्या संदर्भात जनजागृती होणं महत्त्वाचा आहे.
● शासकीय आकडेवारी आणि प्रत्यक्ष वास्तव वेगळे असतात तरी देखील सामाजिक संस्था माध्यमातून महिला बालकल्याण विभाग आरोग्य विभाग चित्र बदलत आहे त्यातच समाधान आहे,सामजिक कार्यकर्त्या स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी काम करणाऱ्या मनीषा तोकले यांनी सांगितले.
● कडक कायदे आणि जनजागृती लिंगनिदान बंद झाल्यानेच जन्मदर ८९८ वरून ९४६ वर पोहोचला आहे. मुलगा आणि मुलगी दुजाभाव करू नका, याबाबत जनजागृती केली जाते. जन्मदर बरोबर करण्यासाठी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत, तसेच लिंगनिदान करणाऱ्यांसाठीही शासनाने कडक नियम केलेले आहेत. त्याचाही फायदा होत आहे. मात्र एवढ्यावरच थांबून जमणार नाही तर लिंग गुणोत्तर आकडा बरोबरीने झाला पाहिजे. महिला बाल कल्याणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान या व्यक्त केले.
● मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी सामूहिक रित्या मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे बीड मधील खटोड प्रतिष्ठान, जन्म झाल्यानंतर मुलीच्या नावाने बँकेत पैसे जमा करणाऱ्या संस्था,त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था आणि शासनाच्या प्रयत्नातून हा जन्मदर वाढला आहे एवढेच नाही तर मुलीचा शिक्षणातील सरकार देखील वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे ऊसतोड मजुराला सारख्या मागासलेल्या घटकांमध्ये देखील मुलींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जात असून आता मुलगी व्हावी यासाठी प्रयत्न करणारेही काही कुटुंब दिसत आहेत यामुळे बिघडलेले लिंग गुणोत्तर बरोबर येण्यासाठी बीडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
टिप्पणी पोस्ट करा