130 कोटी जनतेमुळं 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

130 कोटी जनतेमुळं 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण - पंतप्रधान नरेंद्र मोदी


● भारताने 100 कोटी लशींचे डोस पूर्ण केले. हे खूप मोठं यश आहे. त्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन करतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

● आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधून भाषण करताना मोदी बोलत होते. यावेळी कोरोना लसीसंदर्भात भारताच्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत असल्याचं मोदींनी सांगितलं.


पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

● 100 कोटी लसीकरण फक्त ही फक्त संख्या नाही, देशातील जनतेच्या सामर्थ्याचं प्रतिबंब आहे.

● जे बड्या देशांना जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं

● नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश

● कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं

● लसीकरण मोहिमेत व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही

● जगाला नव्या भारताचं दर्शन

● 100 कोटी लसीचे डोस ही असाधारण गोष्ट

● विक्रमी लसीकरणाचं श्रेय सर्व नागरिकांचं

● 130 कोटी जनतेमुळं 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण करणं शक्य झालं

● लोक भारताच्या लसीकरणाची तुलना इतर देशांशी करत आहेत.

● भारताने ज्या वेगाने लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण केला, त्याचं कौतुक केलं जात आहे.

● 100 कोटी डोस देण्याचा एक परिणाम असाही होईल की जग भारताला कोरोनापासून सुरक्षित मानेल. 

● औषध निर्मिती क्षेत्रात भारताचं सामर्थ्य जगाला कळेल.