काय चुकलं.......खासदार प्रीतमताई मुंडेचं, नेमकं घोड अडल कुठं?





 प्रीतमताई चं काय चुकलं..?  नेमकं घोड अडल कुठं?

ती मुंडे साहेबांची लेक होती म्हणून… की मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भाजप वाढवलं म्हणून..?

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात क्षमता असताना, मोठं जनमत असताना,उच्चशिक्षित(डॉक्टर) असताना, खासदारकीची दुसरी टर्म असताना

, देशात सर्वाधिक मताने निवडून येण्याचा विक्रम नावावर असताना, महिला लोकप्रतिनिधी असताना

संयमी नेतृत्व असताना

,विकासकामे करण्याची मानसिकता असताना,

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असताना,

प्रीतमताईंना मंत्रिपद दिले नाही त्यामुळे भाजप पक्ष त्यांचे गल्ली ते दिल्ली तसेच राज्याचे व केंद्रीय नेतृत्व बद्दल नाराजीचा सूर निघत आहे.

24-25 मे 2014,

खा.गोपीनाथ मुंडे यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश होणार नाही अशा चर्चा.

हो हो नाही नाही करत अखेर साहेबांचा शपथविधी झाला.

लोक आनंदाने वेडेपिसे झाले.

रड रड रडले.

आज प्रितमताईंचा समावेश झाला असता तर जवळपास तेच चित्र राज्यभर पहायला मिळालं असतं !

असं का झालं नसेल बर !

कुरघोडींचं राजकारण की अजून काही ?

आठवतो का तुम्हाला मुंडे भगिनींचा प्रवास ?

-पुन्हा संघर्ष यात्रेस गावोगावी अभुतपुर्व प्रतिसाद ,भगवानगडावर 2014 साली लाखोंचा भावनिक समुदाय ऊरात धडकी भरवणारा.

-2014 साली मुंबईत मंत्रीमंडळात तुमच्या नावाची घोषणा होताच ऊपस्थित सर्व महामहीमांपेक्षा अधिक प्रतिसाद …2014 लोकसभा पोटनिवडणूकीत सर्व विक्रम मोडणारं मताधिक्य..


2017 साली देशाचं लक्ष वेधणारी गोपीनाथगड-भगवानगड रॅली .

-स्वपक्षीयांनी षडयंत्रं करुनही दरवर्षी भगवानभक्तीगडावर लाखोंचा समुदाय आणि चर्चा फक्त तुमच्याच दसरा मेळाव्याची.

-लोकसभेच जातवार जनगननेची मागणी करताना तुम्ही वडीलांप्रमाणेच वंचित शोषितांचा आवाज बनण्याची चुणूक दाखवता.

-तुमचं नाव मंत्रीपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या ऊंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही.


अरे लेकरांनो,

हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे.

त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही.

एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो?

राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे.

गोपीनाथ मुंडे हवे आहेत जनसामान्यांना.

कधीही ऊपलब्ध असणारे, कुठल्याही अटीशिवाय फोनवर कामं करणारे, अर्ध्या रात्री फोन ऊचलणारे.

मुलगामी विचारांच्या पक्षात राहून लोकगामी नितींचा अवलंब करत राजनिती करणारे..

अन्याय दडपण वेदना सोसत पक्षाशी निष्ठा जपत जपत वंचित पिडीत शासित शोषितांच्या ‘वेदना आणि वाणी’ सोबत अधिक प्रखर निष्ठा जपत विरोधकांशी थेट भिडणारे…

आज पंकजाताईचं , प्रितमताईंचं

असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे .

ही तर सुरुवात आहे …!

सुशिक्षित , सर्व सामान्यसाठी मतदार यांच्या साठी रात्रीचा दिवस करणारे व जनसामान्यांचा आवाज म्ह्णून खासदार प्रीतम मुंडे ची ओळख आहे. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मुलगी असताना देखील त्यांना डावलले जात आहे हे सर्वसामान्य जनतेच्या मनात मात्र कायम सल राहणार आहे.कायम पक्षातील स्वकीयांकडून डावलले जात आहे हा इतिहास आहे.भाजप पक्षाला ज्यावेळी obc चेहरा नव्हता त्यावेळेस पासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप ग्रामीण भागात व घराघरात पोहचविण्यासाठी रक्ताचे पाणी केले. पण पक्षातील काही स्वकीयांकडून देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना कायम संघर्षच नशिबी आला.हे मात्र भाजप चे दुर्दैव आहे.जे जनमानसातील नेत्यांना भाजप डावलण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करत आहे . मात्र भाजपच्या ही खेळी त्यांच्यावरच उलटणार आहे. खा.डॉ प्रीतम मुंडेंना डावलणे म्हणजे भाजपने 2024 ला आपल्या जागा कमी करण्यास प्रारंभ केला तर नाही ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळवायचे असेलतर मुंडे ना टाळणे हे भाजप साठी धोकादायकच असणार आहे.