नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप
क्यूबामध्ये सरकारविरोधात आंदोलन
डेली स्टारमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, क्यूबाची राजधानी हवानामध्ये लोक सध्या आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांची पोलीस आणि सरकारच्या समर्थक लोकांसोबत झडपही झाली आहे. आंदोलनकर्ते मोफत वॅक्सीन आणि वाढत्या महागाईवरून क्यूबातील कम्युनिस्ट सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
मिया खलिफाने दिलं स्पष्टीकरण
क्यूबाच्या राष्ट्रपतींनी नॅशनल टीव्हीवर येऊन मिया खलिफावर गंभीर आरोप लावले आहेत. यावर मिया खलिफाने ट्विट करत सांगितलं की, मला लोकांना तुमच्या अमानवतेबाबत जागरूक करण्यासाठी कोणतंही सरकार पैसे देत नाहीये. मी हे फ्रीमध्ये आणि आपला वेळ देऊन करते'.
दरम्यान, क्यूबाची राजधानी हवानामध्ये राष्ट्रपती मिगेल दियाज कनेलचं सरकारच्या राजकीय आणि आर्थिक नीतिंविरोधात लोक आंदोलन करत आहेत. गेल्या ११ आणि १२ जुलैलला पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे क्यूबातील सरकार दबावात आहे.
Source lokmat
टिप्पणी पोस्ट करा