आजपासून घरामधील स्वयंपाक महागला; जाणून घ्या, नवीन दर

आजपासून घरामधील स्वयंपाक महागला; जाणून घ्या, नवीन दर


● देशात दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. 

● अशातच आता पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 

● सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. 

● वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता ८३४ रुपयांवर पोहोचले आहेत. 

● यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०९ रुपये होती. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती १० रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या, त्यानंतर मे-जूनमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. 


प्रमुख शहरातील एलपीजी सिलेंडर दर

शहर l दर 

- दिल्ली : ८३४ रुपये

- कोलकाता : ८६१ रुपये 

- मुंबई : ८३४ रुपये 

- चेन्नई : ८५० रुपये 

Beed News Paper List

  • Ilovebeed Digital Magazine
  • Beed citizen newspaper
  • Reporter newspaper beed
  • Beed reporter today

Join WhatsApp Group

🪀 Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा ilovebeed.com वर