...आणि तिचा 'तो' शेवटचा फोटो ठरला



...आणि तिचा 'तो' शेवटचा फोटो ठरला

▪️ हिमाचल प्रदेशच्या किन्नोर येथे रविवारी एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. 

▪️ या ठिकाणी जीवनातील काही क्षण आनंदाचे घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. 

▪️ पहाडी परिसरात दरड कोसळल्यानं सर्व काही वाहून गेले. किन्नौर येथील या दुर्घटनेत एकूण ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

▪️ याच मृतांमध्ये आयुर्वेदाची डॉक्टर दीपा शर्माचा समावेश होता.

दीपा शर्मा सोशल मीडियावर खूप फेमस आहे. 

▪️ जेव्हा ती पहिल्यांदा एकटी प्रवास करत होती, तेव्हापासून ती सोशल मीडियात तिच्या प्रवासाबद्दल अपडेट देत राहते. 

▪️ परंतु कुणालाही ठाऊक नव्हतं की, हा प्रवास तिचा शेवटचा असेल.

▪️ किन्नौरमध्ये दरड कोसळल्यानं डॉ. दीपा शर्माचा मृत्यू झाला. रविवारी जेव्हा ही दुर्घटना घडली.

▪️ दरम्यान, त्याच्या काही वेळेपूर्वी दीपा शर्मानं तिच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता.


पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली : 

▪️ किन्नौरच्या अपघातात दीपा शर्मासह ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला. 

▪️ दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली. 

▪️ त्याशिवाय मृतकांच्या वारसांना नुकसाई भरपाई देण्याचीही घोषणा केली आहे.