विहिरीच्या वादातून चुलत्याला लोखंडी दाताळ्याने मारहाण वाचा सविस्तर

केज - विहिरीच्या वादातून चुलत्याला लोखंडी दाताळ्याने मारहाण केली. यामध्ये चुलता गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे बुधवारी घडली. या प्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या सामाईक विहिरीवरून सामाईक पाईप लाईन केलेली आहे. या पाईपलाईनच्या कारणा वरून अनेक वेळा गुरुलिंग दराडे व त्यांचे भाऊ गोरख दराडे आणि पुतणे श्रीहरी दराडे यांच्यात भांडणे होत आसत. 

केज पोलीस स्टेशनला हजर होऊन दिलेल्या तक्रारी नुसार श्रीहरी गोरख दराडे, गोरख बारीकराव दराडे, सिमा गोरख दराडे आणि सोनाली श्रीहरी दराडे यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचे उद्देशाने व घातक हत्याराने मारहाण करणे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली गु.र.नं. 292/2021 कलम 307, 326, 323, 504, 506 आणि 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.