घरच्या घरी असा तयार करा आयुर्वेदिक काढा!

 




रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली कि, कोरोनापासून दूर राहणे शक्य आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने घरच्या घरी आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील... 


साहित्य : तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे.


कृती : वरील सर्व साहित्य एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल. 


📍 लक्षात ठेवा! 


● जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. 

● काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता घरी काढा तयार करत आहेत. जे चुकीचे आहे.